सोलापूर- महानगरपालिकेच्या चालू अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी आज गुरुवारी सभा बोलवण्यात आली होती. 29 जानेवारीच्या सभेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली होती. आज गुरुवारी सभा पार पडली. आज देखील अभूतपूर्व गोंधळात सभागृह नेता श्रीनिवास करली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. यावेळी 'वंचित'चे आनंद चंदनशिवे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, काँग्रेसचे यु एन बेरिया, एमआयएमचे तौफिक शेख, शिवसेनेचे अमोल शिंदे, महेश कोठे, सुनिता रोटे, फिरदोस पटेल आदी नगरसेवकांनी विरोध केला. महापौर श्रीकांचना यंनम यांनी हे बजेट मंजूर झाले असल्याचे जाहीर करत सभा संपली असे जाहीर केले.
कोरोना महामारीमुळे मार्च 2020 मध्ये बजेट सादर करता आले नव्हते. त्यामुळे पालिकेच्या झालेल्या खर्चानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये 2019-2020 चे बजेट सादर करण्यात आले होते. सन 2020-2021 चे बजेट पुढील महिन्यात सादर केले जाणार आहे. आज झालेल्या या अर्थसंकल्पामध्ये विविध विषयांना मंजुरी देत 753 कोटी 74 लाख 97 हजार 401 रुपयांच्या अर्थसंकल्पास महापौर यांनी बहुमताने मंजुरी देत दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सभा पार पडल्याची माहिती दिली.
पाणी प्रश्नावरून सुरू झाला गोंधळ-