सोलापूर : पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात ( Pandharpur Sub-District Hospital ) काम करत असलेल्या एनआरएचएमच्या 8 कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून वेतन मिळाले नाही. आपल्या कामाचे आणि हक्काचे वेतन मिळावे, यासाठी या 8 कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ( Collector Office ) एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले आहे की, वर्षभरापासून आमची ससेहोलपट सुरू आहे. वेतन होत नसल्याने संसाराचा गाडा चालवणे, अवघड झाले आहे. गळ्यातील मंगळसूत्र सोनाराकडे घाणवट ठेवले आहे, सावकाराकडून ( money lender ) कर्ज काढले, मुलांचे अडमिशन थांबले, अशा अनेक व्यथा त्यांनी सांगितले आहेत. आमचे वेतन सिव्हिल सर्जन ( Civil Surgeon )यांच्या गलथान कारभारामुळे झाले आहे. त्यांनीच वेतन सुरळीत करावे, अन्यथा आम्ही आषाढ वारीत विठ्ठल मंदिरासमोर आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.
या 8 कर्मचाऱ्यांच्या पगार झाल्या नाहीत- सीता गणेश घंटे, लक्ष्मी ज्ञानेश्वर नांदरे, महादेवी रामचंद्र वैरागकर, प्रशांत शिवाजी म्हस्के, रेखा किशोर आगवणे, अंजली सुनील राठोड, साधना मंगेश आंबेकर, ज्ञानेश्वर पाटील हे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सपोर्ट स्टाफ, अटेंडन्ट, वॉचमन, आया, मावशी, कुक अशा पदांवर काम करत आहेत. यांची 26 जानेवारी 2018 रोजी नियुक्ती एनआरएचएम ( राष्ट्रीय आरोग्य अभियान ) अंतर्गत झाली आहे. या नियुक्ती पत्रास सिव्हिल सर्जन यांचे आदेश जोडण्यात आले आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी पुनर्नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना 6 हजार वेतन देण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात पगार वाढ करत कोविड भत्ता आणि इतर भत्ते असे मिळून मार्च 2021 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत 15 हजार 500 रुपये वेतन देण्यात आली होती.
सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयाकडून वेतन कपात सुरू- पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या या 8 कर्मचाऱ्यांना सिव्हिल सर्जन कार्यालयाकडून सांगितले गेले की, तुम्हाला 6 हजार ऐवजी 15 हजार 500 रुपये हे वेतन चुकून आले आहे. त्याची वसुली किंवा वेतन कपात सुरू केली जाणार आहे, आणि ऑगस्ट 2021 पासून या 8 कर्मचाऱ्यांना आजतागायत एक रुपया देखील वेतन दिले गेले नाही. अनेक निवेदने देण्यात आली आहेत. जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी, एनआरएचएमच्या लेखाव्यवस्थापक, डीपीएम यांना भेटून व्यथा मांडल्या, पण हे सर्व अधिकारी हाथ झटकण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती आंदोलकांनी यावेळी बोलताना दिली आहे.