महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Teacher Arrested : शिक्षकानं दाखवली 'कला'; रात्री करायचा पेट्रोल चोरी - Solapur District Madha Taluka

माढा तालुक्यात सागर लाड हा मोहोळ येथील एका विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत होता. मागील काही दिवसांपासून सन्मती नगर परिसरातील भागातील मोटारसायकलमधून तो पेट्रोल चोरी करायचा (Teacher Petrol Stealing ) . त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले होते.

sagar lad
सागर लाड

By

Published : Dec 26, 2021, 7:23 PM IST

माढा (सोलापूर) :शिक्षक म्हटलं की अध्यापन. याच अध्यापणातून अनेक पिढ्या घडल्या. मात्र, तो शिक्षकच जर चोर निघाला तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा. अशीच काहीशी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ( Solapur District Madha Taluka ) घडली. कला शिक्षकालाच पेट्रोलची चोरी करताना रंगहात पकडले आहे ( Teacher Arrested Petrol Stealing ).

सन्मती नगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. सागर सहदेव लाड ( रा.वाफळे ता.मोहोळ ) असे पकडण्यात आलेल्या चोराचे नावं आहे. याबाबत आण्णाराव नागनाथ खंडागळे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली असून, लाड याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लाडला अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता ३ दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सागर लाड

पेट्रोल चोरीमुळे नागरिक त्रस्त

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, सागर लाड हा सध्या मोहोळ मधील एका विद्यालयात कलाशिक्षक म्हणुन कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून सन्मतीनगर भागातील मोटारसायकल मधुन पेट्रोल चोरी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच आण्णाराव खंडागळे, लक्ष्मण पाटेकर, बापू पाटेकर, राहुल नरखेडकर व इतर लोकांचे घरासमोर लावलेल्या मोटारसायकली मधील पेट्रोल चोरताना विनायक जाधव, अजिंक्य काटे, प्रविण जगदाळे, लक्ष्मण पाटेकर यांनी जागेवर पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले असता, लाड गुन्ह्याची कबूली दिली. पोलिस त्याच्या अन्य साथिदारांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा -Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यपालांना साकडे

ABOUT THE AUTHOR

...view details