महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

निरेचं पाणी गावतलावात सोडा; सोलापूर जिल्ह्यातील तीन गावांची मागणी - Nire water issue

माळशिरस तालुक्यातील निमगाव, पठाण वस्ती आणि चांदापुरी या तीन गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी नीरा उजव्या कालव्यातून पाणी गाव तलावात सोडावे अशी मागणी केली आहे.

निरेच पाणी गावतलावात सोडा; सोलापूर जिल्ह्यातील तीन गावांची मागणी

By

Published : Sep 3, 2019, 8:14 PM IST

सोलापूर - माळशिरस तालुक्यातील निमगाव, पठाण वस्ती आणि चांदापुरी या तीनही गावात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतल्या तलावात नीरा उजव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

निरेच पाणी गावतलावात सोडा; सोलापूर जिल्ह्यातील तीन गावांची मागणी

सध्या नीरा धरणातून सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील टेलच्या गावांना रोटेशननुसार पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, टेलच्या गावांमधील पाण्याची गरज अद्याप संपलेली नाही. हे पाणी हेडच्या लोकांना मिळणे बाकी आहे. मात्र, तो पर्यंत हेडच्या लोकांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे आपली पाण्याची मागणी महसूल प्रशासन आणि मग जलसंपदा विभागाकडे मांडून झाल्यानंतर, गावकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. ग्रामस्थांनी निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

पाण्याची टंचाई, निकड आणि नियोजन या संदर्भातली एक महत्वाची बैठक सोलापुरात होत आहे. त्या बैठकीत आपल्या गावाच्या पाण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा अशी मागणी गावकरी करत आहेत. कायम बागायती पट्ट्यातील गावकऱ्यांची पाण्यासाठी आंदोलनांची ही पहिलीच वेळ आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details