महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Father Abuse On Minor Child : सोळा महिन्याच्या बाळावर बापाचा अनैसर्गिक अत्याचार करुन खून - सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस

बापानेच सोळा महिन्याच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करुन तिचा ( Father Abuse On Minor Child ) खून केल्याचे समोर आले आहे. हैदराबाद येथे हा गुन्हा घडला आहे. याप्रकरणी सोलापूर रेल्वे पोलिसांनी कारवाई ( Solapur Railway police Action ) केली आहे.

Father Abuse On Minor Child
Father Abuse On Minor Child

By

Published : Jan 6, 2022, 6:00 PM IST

सोलापूर : सोळा महिन्याच्या बाळावर बापानेच अनैसर्गिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून ( Father Abuse On Minor Child ) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस ( Secunderabad Rajkot Express ) मधून पतीपत्नीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, सोलापूर लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, हा नराधम बाप हैदराबाद येथे मोलमजूरी करतो. त्याने 3 जानेवारीला आपल्या सोळा महिन्यांच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करुन तिचा खून केला. हैदराबाद पोलिसांनी ही बाब कळेल या भीतीपोटी तो आपल्या पत्नीला घेऊन राजस्थानातील मुळ गावी निघाला होता.

अप्पर पोलीस अधिक्षक गणेश शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून...

मृतदेहाचा वास येऊ नये अथवा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसच्या एसी डब्यातुन प्रवास सुरु केला. मात्र, सिकंदराबाद पासून बाळ रडत नाही, उठत नाही यामुळे डब्यातील प्रवाशांना संशय बळावला. त्यानूसार प्रवाशांनी तिकीट निरीक्षकला याची माहिती दिली. त्यानंतर गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली असताना पती पत्नीला खाली उतरवून चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी बाळ आजारी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच, बाळाच्या मृतदेहाची मेडिकल टेस्ट केली असता अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून खून केल्याचे समोर आले.

पोलिसांनी हाणून पाडला डाव

बाळाचा खून केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपी पत्नीसोबत संगनमत करून मृतदेह घेऊन सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. दरम्यान, या गुन्हाचा तपास हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, साबीर जरतार, संजय जाधव आदींनी प्रमुख भूमिका बजावली.

हेही वाचा -Maharashtra Lockdown : राज्यात विकेंड लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details