महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Solapur Crime प्रियकरासोबत कट रचून पत्नीने चिरला पतीचा गळा, 24 तासात पोलिसांनी असा लावला छडा

Solapur Crime दशरथ नागनाथ नारायणकर या व्यक्तीचा खून 21 सप्टेंबर रोजी झाला होता. क्राईम ब्रँचने या खुनाचा छडा लावत 24 तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गुन्हे शाखेने याबाबत अधिकृत माहिती दिली. ( Solapur Crime ) मयत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा नारायणकर व तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

Solapur Crime
Solapur Crime

By

Published : Sep 22, 2022, 8:01 PM IST

सोलापूरदशरथ नागनाथ नारायणकर या व्यक्तीचा खून 21 सप्टेंबर रोजी झाला होता. क्राईम ब्रँचने या खुनाचा छडा लावत 24 तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गुन्हे शाखेने याबाबत अधिकृत माहिती दिली. ( Solapur Crime ) मयत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा नारायणकर व तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. ( Solapur Police ) या दोघांनी संगनमत करून, दशरथ नारायणकर याचा गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे, अशी अधिकृत माहिती ( Solapur Police ) पोलिसांनी दिली आहे.

गुन्हे शाखेचे एपीआय संजय क्षीरसागर, महाडिक, संदीप पाटील, महेश शिंदे, निळोफर तांबोळी, कृष्णात कोळी, राजू मुदगल, कुमार शेळके यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अनैतिक संबंधातून किंवा विवाहबाह्य संबंधातून ही निर्घृण हत्या ( Solapur Crime ) झाल्याची माहिती देण्यात आली.

अनैतिक संबंधाचा अखेर अंत

अरुणा आणि बाबासो या दोघांचे अनैतिक संबंध होतेमयत दशरथ नारायणकर हा मूळचा अक्कलकोट तालुक्यातील डोंबारजवळगे येथील रहिवासी होता. कामानिमित्त सोलापुरातील जुना विडी घरकुल येथील केकडे नगर येथे राहावयास होता. दशरथ नारायणकर हा लग्नानंतर काही वर्षे, डोंबारजवळगे (ता अक्कलकोट ) येथे राहावयास होता. यावेळी विवाहित अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघांचे अनैतिक संबंध निर्माण झाले. ही बाब पती दशरथ नारायणकर याला कळताच त्याने विरोध केला होता. गाव सोडून सोलापुरात वास्तव्यास होता. या ठिकाणी देखील पती दशरथ घरी नसताना बाबासो अरुणाला भेटायला येत होता.

पती दशरथचा गळा चिरून काटा काढलाअरुणा आणि बाबासो बाळशंकर याने दशरथचा काटा काढण्यासाठी डाव रचला होता. त्यासाठी दोघांनी मिळून नायलॉनची दोरी, झोपेच्या गोळ्या, आणि चाकु खरेदी केले होते. व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघांनी मिळून दशरथ नारायणकर याची गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर मयताची पत्नी अरुणा हिने पोलिसांना माहिती दिली. माझ्या पतीला कोणीतरी अज्ञात इसमाने ठार केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अरुणा नारायणकर हिचा जबाब घेतला व तपास सुरू केला.

गुन्हे शाखेने तपास करून खरी माहिती समोर आणलीखुनाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी जुना विडी घरकुल येथील केकडे नगर येथे जाऊन पाहणी केली. कसोशीने तपास करत अरुणा यास 21 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. अधिक विश्वासात घेऊन माहिती विचारली असता तिने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. प्रियकर बाबासो बाळशंकर यासोबत तिने पती दशरथ नारायणकर याचा खून केले असल्याची माहिती दिली. खून केल्यानंतर दोघे पळून देखील जाणार होते. प्रियकर हा खून करून डोंबारजवळगे (ता अक्कलकोट) येथे गेला होता. 21 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव मार्गावर येणार होता. गुन्हे शाखेने ताबडतोब त्याला 21 सप्टेंबर रोजी रात्री ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. 22 सप्टेंबर रोजी दिवसभर तपास करून गुन्हे शाखेने सायंकाळी दोघांना संशयीत आरोपींची नावे माध्यमांना दिली आहेत.

अनैतिक संबंधात पती दशरथ बळी गेलाअनैतिक संबंधाचा शेवट झाला. अरुणा नारायणकर व दशरथ नारायणकर या दाम्पत्यास बारा वर्षांची मुलगी आहे. अरुणा हिचे बाबासो बाळशंकर यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी दशरथची गळा चिरून हत्या केली. अनैतिक संबंधाचा शेवट झाला आणि अरुणाने पती गमावला. पती पत्नी एक मुलगी अशा गोड संसारात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव झाला आणि अख्खा कुटुंब उद्धवस्त झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details