सोलापूर -केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. तसेच शेतकरी विरोधी कायदे करून जनतेची व शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. याविरोधात युवक काँग्रेस शहर यांच्या वतीने चार पुतळा परिसरात बुधवारी सायंकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मशाली पेटवून केंद्र सरकार व भाजपा सरकारचा निषेध केला आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
चार पुतळा परिसरात निदर्शने -
युवक काँग्रेसच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात बुधवारी सायंकाळी मशाल पेटवून आंदोलन केले. केंद्र सरकारने लोकसभेत होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे आणि शेतकरी विरोधात केलेले कायदे रद्द करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी निदर्शनात करण्यात आली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे मशाल पेटवून निदर्शन - सोलापूर काँग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध न्यूज
युवक काँग्रेसच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात बुधवारी सायंकाळी मशाल पेटवून आंदोलन केले. केंद्र सरकारने लोकसभेत होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे आणि शेतकरी विरोधात केलेले कायदे रद्द करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी निदर्शनात करण्यात आली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे मशाल पेटवून निदर्शने
अंबादास करगुळे बोलताना...
संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केले तसेच शेतकरी विरोधी केलेले कायदे देखील रद्द झाले पाहिजे, अशी प्रमुख मागणी यावेळी मशाल आंदोलनात करण्यात आली. उत्तर भारतातल्या कडाक्याची थंडीत गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. तरी देखील सरकार मूग गिळून गप्प आहे, सरकारने या शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे अशी मागणी करत, केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी आंदोलनात बाबा करगुळे, तिरुपती परकीपांडला, सैफन शेख, योगेश मार्गम, गोविंद कांबळे, महेश लोंढे, युवराज जाधव, सागर शाह, शरद गुंमठेसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.