महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपची निदर्शने - राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपची निदर्शने

राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावरून भाजपने राज्य विधीमंडळ तसेच रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेतली आहे.

solapur bjp
राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपची निदर्शने

By

Published : Dec 17, 2019, 8:48 AM IST

Updated : Dec 17, 2019, 8:56 AM IST

सोलापूर- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सोलापूर शहर भाजपच्यावतीने राजेंद्र चौकात निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावरून भाजपने राज्य विधीमंडळ तसेच रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपची निदर्शने

हेही वाचा -हैदराबाद-उन्नाव नाही सोलापुरात, मध्यप्रदेशच्या सुखरुप गुडियाची कहाणी

त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर भाजपने हे आंदोलन केले आहे. यावेळी सावरकरांच्या समर्थनार्थ तर, राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

ज्यांचा इतिहास स्वतःला माहीत नाही त्या राहुल गांधी यांनी आद्यक्रांतिकारकांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा या आंदोलकांनी दिला.

Last Updated : Dec 17, 2019, 8:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details