महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाणे अँटी करप्शनच्या रडारवर;सहा महिन्यांत दुसरी कारवाई

सोलापुरातील तक्रारदार यावर 107 कलमाअनव्ये सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 मे ते 10 मे दरम्यान हजेरी लावणे बंधनकारक होते. हजेरी लावल्याबाबतचे प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्यासाठी पोलीस नाईक नाना शिंदे यांनी पाचशे रुपये लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय सोलापूर येथे तक्रार दाखल केले होती. यानुसार काल मंगळवारी सकाळी 11 दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता.पोलीस कर्मचारी पाचशे रुपये लाच घेताना अँटी करप्शन विभागाने ताबडतोब कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

solapur acb arrest sadar bazar police thane police for accepting bribe
सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाणे अँटी करप्शनच्या रडारवर

By

Published : May 11, 2022, 5:38 PM IST

Updated : May 11, 2022, 8:01 PM IST

सोलापूर - सदर बाजार पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त कार्यालय हाकेच्या अंतरावर असलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात अँटी करप्शनची दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे. एकीकडे पोलीस आयुक्त हरीश बैजल शिस्त आणि अनुशासन लावण्यात व्यस्त असताना शहर पोलीस दलातील पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे पोलीस आयुक्तांना घरचा आहेर मिळाला आहे. नाना बेशा शिंदे (वय 37 वर्ष,रा. अरविंद धाम पोलीस वसाहत, नियुक्ती सदर बाजार पोलीस ठाणे) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाणे अँटी करप्शनच्या रडारवर

तक्रारदारास हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच -सोलापुरातील तक्रारदार यावर 107 कलमाअनव्ये सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 मे ते 10 मे दरम्यान हजेरी लावणे बंधनकारक होते. हजेरी लावल्याबाबतचे प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्यासाठी पोलीस नाईक नाना शिंदे यांनी पाचशे रुपये लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय सोलापूर येथे तक्रार दाखल केले होती. यानुसार काल मंगळवारी सकाळी 11 दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता.पोलीस कर्मचारी पाचशे रुपये लाच घेताना अँटी करप्शन विभागाने ताबडतोब कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर बाजार पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा कारवाई -पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सदर बाजार पोलीस ठाणे अँटी करप्शनच्या रडारवर आहे. कारण सहा महिन्यांत दुसऱ्यांदा या पोलीस ठाण्यात लाच घेताना रंगेहाथ पोलीस कर्मचारी अडकला आहे. यापूर्वी सर्जेराव शंकर पाटील (वय 38 वर्ष,नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे) यावर 4 डिसेंबर 2021 रोजी 2 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ कारवाई झाली होती.काल 10 मे मंगळवारी सकाळी नाना शिंदे यास पाचशे रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाने कारवाई केली आहे.

अँटी करप्शन सोलापूर युनिटनची कारवाई-सदर बाजार पोलीस ठाणे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने सोलापूर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधकमधील निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक, पोलीस नाईक पकाले, घुगे, पवार, सन्नके यांनी केली आहे. या कारवाईमध्ये उपअधीक्षक संजीव पाटील,सुरज गुरव,अधीक्षक राजेश बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.

Last Updated : May 11, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details