सोलापूर - दिल्लीत सुरु असलेल्याशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोलापुरात सिटूच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सिटू चे राज्यसचिव युसूफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलन करताना सिटूच्या कार्यकर्त्यांना सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे.
बळाचा वापर करून घेतले ताब्यात-
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात तीन काळे कायदे पारित केले. त्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. घोषणा देताना पोलिसांनी बळाचा वापर करून सिटूच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.