महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 श्री प्रतिष्ठानने गणेशोत्सव मंडळाचा अमरनाथ देखावा सादर, भाविकांना अमरनाथला आल्याची होते जाणीव

कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सोलापुरातील गणेश मंडळ ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत आहेत. सोलापूर शहरातील गणेश भक्त देखील या देखाव्यांचे कौतुक करत, गणपतीचे दर्शन घेत आहेत. Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022
अमरनाथ देखावा

By

Published : Sep 7, 2022, 6:12 PM IST

सोलापूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सोलापुरातील गणेश मंडळ ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत आहेत. सोलापूर शहरातील गणेश भक्त देखील या देखाव्यांचे कौतुक करत, गणपतीचे दर्शन घेत आहेत. सोलापूर शहरातील 70 फूट रोड येथे, श्री प्रतिष्ठानने गणेशोत्सव मंडळाने हुबेहूब अमरनाथ देखावा सादर केला आहे. गणेश भक्त मोठ्या संख्येने याठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत. Ganeshotsav 2022


अमरनाथ यात्रेतुन प्रेरणा घेऊन, देखावा केला तयारश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय आडम यांनी माहिती देताना सांगितले की, माझे भाऊ कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर अमरनाथ यात्रेला जाऊन आले होते. त्यावेळी त्यांना ही संकल्पना सुचली होती. मात्र कोरोना महामारीच्या संसर्गजन्य आजारामुळे लॉकडाऊन सुरू झाले. सार्वजनिक उत्सवांवर अनेक निर्बंध लादले गेले. दोन वर्षांपासून गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरा करण्याची परवानगी नव्हती. पण यंदा हे निर्बंध शिथिल झाल्यामुळे, श्री प्रतिष्ठान येथे जम्मू-काश्मीर येथील अमरनाथ देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी शहरातील भक्तांची रांग लागली आहे.


अमरनाथ देखावा सादर करण्यासाठी या वस्तूंचा वापरजम्मू-काश्मीर येथील महादेव मंदिर असलेले, अमरनाथ मंदिर येथे जसे बर्फाळ प्रदेश आहे. त्याप्रमाणे सोलापुरातील श्री प्रतिष्ठान ने गणेश मंडळात बर्फाळ प्रदेश साकारला आहे. यासाठी त्यांनी कापूस आणि प्लास्टरचा भरपूर वापर केला आहे. जम्मू काश्मीर मधील अमरनाथ मंदिर परिसरात जसे बर्फवृष्टी होते, तशी बर्फवृष्टी कापसातून दाखवण्याचा प्रयत्न श्री प्रतिष्ठानने केला आहे. थंड वाऱ्या साठी आईस कुलर देखील ठेवले आहे.आणि या वाऱ्यात कापूस उडत असतात. Ganeshotsav 2022

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details