महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांविषयी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, शिवसेनेने दिला जीभ हासडण्याचा इशारा - पालकमंकत्री दत्तात्रय भरणे

दरम्यान या प्रकरणावर पालकमंत्री भरणे यांनी माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मुख्यमंत्र्यांविषयी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना आदर आहे. गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे, तसेच जर माझ्या वक्तव्यांनी कोणाची भावना दुखावली असल्यास मी दिलीगरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दत्तात्रय भरणे यांचे वादग्रस्त वक्तव्य
दत्तात्रय भरणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

By

Published : Aug 15, 2021, 3:06 PM IST

Updated : Aug 18, 2021, 11:24 AM IST

सोलापूर-सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे कार्यक्रम होते. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे 43 एकर जागेवर वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे बोलताना मुखमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे सोलापुरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांनी ताबडतोब दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर घसरलेली जीभ बाहेर काढू अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दत्तात्रय भरणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान या प्रकरणावर पालकमंत्री भरणे यांनी माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मुख्यमंत्र्यांविषयी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना आदर आहे. गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे, तसेच जर माझ्या वक्तव्यांनी कोणाची भावना दुखावली असल्यास मी दिलीगरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

माझी वसुंधरा कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य-

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत कौतुक केले, त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे यांना उत्तर देत म्हणाले आनंद दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचा आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या, असे आवाहन केले. मात्र महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरु द्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित सर्वजण आवाक झाले.

शिवसेना नेते आक्रमक;घसरलेली जीभ बाहेर काढू-


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मरू द्या अशी भाषा वापरली. यावरून पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पालकमंत्र्यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपवावा अन्यथा शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,घसरलेली जीभ बाहेर काढू असा थेट इशारा दिला.

Last Updated : Aug 18, 2021, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details