सोलापूर - राज्यासह देशात तसेच अमेरिकेत देखील महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांनी केला आहे. दिलीप माने यांनी निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
अमेरिकेतही महायुतीची सत्ता येणार; शिवसेनेच्या उमेदवाराचा दावा - shivsena candidate dilip mane's statement
राज्यातसह देशात तसेच अमेरिकेत देखील महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांनी केला आहे. दिलीप माने यांनी निवडणूकीपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला असून, ते सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
राज्यातसह देशात तसेच अमेरिकेत देखील महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांनी केला
या मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना उमेदवारी नाकारून दिलीप माने यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यानंतर त्यांनी मतदारसंघातून प्रचार रॅली काढली.
यादरम्यान, मी कायम स्वरूपी सोलापूर शहरात राहणारा कार्यकर्ता असून, तुम्हाला तुमच्या आमदाराला भेटायला कधीही मुंबईला जायची गरज पडणार नाही, असे ते म्हणाले.