सोलापूरशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे फक्त विनोद करू शकतात, मतदार संघात विकास करू शकत नाहीत. शिवसेना खासदार विनायक राऊत हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. MP Vinayak Raut Criticism सांगोला येथील मतदार संघात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मत मागितलीमहाराष्ट्र राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मत मागण्याचे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू केले आहे. कारण त्यांना माहिती झालं आहे, नरेंद्र मोदी यांची जादू संपली आहे. मोदी पर्व संपल आहे, हे देवेंद्र यांनी मान्य केलं आहे. Shiv Sena MP Vinayak Raut महाराष्ट्र राज्यात आज जी मुंबई उभी आहे, ती केवळ शिवसेनेमुळे आणि तेथील शिवसेनेच्या नगरसेवकांमुळे उभी आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.