सोलापूर -राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिनउत्साहात साजरा करावा तसेच सरकारी कार्यालयांमध्ये तसेच विविध ठिकाणी हा दिन साजरा करावा असे पत्र शासनाने दिले आहे. मात्र सोलापूर एसटी स्टँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजनकेले ( Not worship of Chhatrapati Shivaji Maharaj image ) नाही ही बाब शिवसैनिकांना लक्षात आल्यानंतर संताप व्यक्त ( Solapur Shiv Sainiks angry ) केला. व बस स्थानकातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आगार प्रमुखांनी देखील दिलगिरी व्यक्त केली.
बसस्थानकात शिवसैनिकांचा गोंधळ -सोलापूर बस स्टँड आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूजा करण्यात आली नव्हती. ही बाब समजताच शिवसैनिक संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सोलापूर आगार प्रमुखाच्या केबिनमध्ये जाऊन गोंधळ घातला. एसटी महामंडळाचे काम बंद पाडले. फाईली व रजिस्टर्स फेकून दिल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याच्या सूचना केल्या.