सोलापूर -ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सर्व जनतेला दिसत आहे. देशातील रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचे काम सुरू आहे. नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला. मात्र मोदी सरकार या सर्व गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत आहे. मला ईडीची नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र जनतेने यांना वेडी ठरवले, असे सांगत शरद पवार यांनी केंद्रावर टीका केली. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली.
हेही वाचा -हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
'हत्येचा गुन्हा व्हावा'
शेतकरी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यामध्ये 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या संशयित आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कठोर शासन त्यांना झाले पाहिजे, असे ते म्हणाले.