सोलापूर -राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना गेली पन्नस वर्ष सत्तेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसचे धोरण आणि त्यांच्या सत्तेमध्ये सहभागी असलेले शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोपी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सोलापुरात केला. औरंगाबाद येथे शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीची माहिती सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना व्हावी म्हणून रघुनाथ पाटील यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात ही पत्रकार परिषद घेतली.
'शेतकरी आत्महत्यांना काँग्रेसच्या धोरणांसह शरद पवारच जबाबदार' - News about the Farmers Association
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना पन्नस वर्ष राजकारण करणाऱ्या काँग्रेसचे धोरण आणि सत्तेत सहभागी असलेले शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सोलापूर येथे केला.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील
पत्रकार परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते रघुनाथदादा यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर देशातल्या राज्यकर्त्यांची काँग्रेसी मानसिकता आणि पर्यायानं दीर्घकाळ सत्तास्थानी राहिलेले शरद पवारच जबाबदार असल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर शेतकरी पुत्र, मराठ्यांचा नेता, जाणता राजा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या का करतात याचे उत्तर द्यावे असे आव्हानही पाटील यांनी पवारांना यानिमित्ताने दिले.