सोलापूर-सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. गुरुवारी शहरात 71 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2813 झाली, तर मृतांची संख्या 280 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 974 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1559 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर शहरात गुरुवारी 193 अहवाल प्राप्त झाले, यात 122 अहवाल निगेटिव्ह तर 71 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 45 पुरुष तर 26 महिलांचा समावेश आहे. शहरातील 46 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.