महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर महानगरपालिकेतील निवडणुकीला 'नगरविकास'कडून सात दिवसांची स्थगिती - Mahavikas Aghadi in Solapur corporation

सोलापूर महापालिकेच्या स्थायी आणि परिवहन या दोन्ही समित्यात भाजप आणि विरोधकांचे समान संख्याबळ आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज एकत्र भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. भाजपने स्थायी समिती 10 विरुद्ध 6 अशी जिंकणार असा दावाही केला होता.

crowd in solapur corporation
सोलापूर महापालिकेत गर्दी

By

Published : Mar 5, 2021, 7:47 PM IST

Updated : Mar 5, 2021, 8:10 PM IST

सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापती निवडणुकीला नगरविकास विभागाने 7 दिवसांची स्थगिती दिली आहे. यामुळे आज शुक्रवारी होणारी निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या फोडाफोडीचे राजकारण व घोडेबाजाराला ब्रेक लागला आहे.

सोलापूर महापालिकेच्या स्थायी आणि परिवहन या दोन्ही समित्यात भाजप आणि विरोधकांचे समान संख्याबळ आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज एकत्र भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. भाजपने स्थायी समिती 10 विरुद्ध 6 अशी जिंकणार असा दावाही केला होता.


स्थायी समितीत समान संख्याबळ-
सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. यात भाजप 8 आणि विरोधी आघाडीचे 8 आहेत. सदस्य समिती निवड 20 फेब्रुवारीला झाली होती. यावेळी गटनेत्यांनी दिलेली नावे संख्याबळानुसार पालिका सभागृहात निश्चित झाली होती.

सोलापूर महानगरपालिकेतील निवडणुकीला 'नगरविकास'कडून सात दिवसांची स्थगिती

हेही वाचा-मानसुख हिरेन बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी मित्रांना केला होता संपर्क?

एमआयएम पक्षाच्या गटबाजीत दोन नावे दाखल-
सोलापूर एमआयएम पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. विद्यमान शहर अध्यक्ष गट आणि माजी शहर अध्यक्ष गट या दोन्ही गटांनी दोन दावे दाखल केले होते. नूतन गायकवाड यांनी पूनम बनसोडे यांच नाव दिले होते. तर रियाझ खरादी यांनी एमआयएमचे गटनेते आपण असून स्वत:चे नाव दिल्याचा दावा केला होता. याप्रकरणी महापौर कांचना यंनम यांनी एमआयएम पक्षाचे गटनेते रियाझ खरादी यांचे म्हणणे मान्य केले होते. या प्रकरणावरून एमआयएम पक्षाच्या गटनेत्या नूतन गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांकडे न्याय मागितला होता.

हेही वाचा-प्राप्तिकर विभागाची सलग तिसर्‍या दिवशी छापेमारी सुरू

नगरविकास विभागाने दिली स्थगिती -
एमआयएम पक्षाच्या गटनेत्या नूतन गायकवाड यांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. पण, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून न्यायमिळत नसल्याने हे प्रकरण नगरविकास विभागाकडे गेले होते. तेथून उपसचिव मोघे यांच्या स्वाक्षरीने सोलापूर महानगरपालिकेला आज शुक्रवारी आदेश प्राप्त झाला. विभागीय आयुक्तांकडून अहवाल येईपर्यंत स्थायी समिती व परिवहन समितीची निवडणूक सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे.

भाजपने गुलालाची तयारी केली होती-
सोलापूर महानगरपालिकेत भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष निवडून येईल म्हणून भाजपच्या सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी गुलालाची तयारी केली होती. रियाझ खरादी आणि वैष्णव करगुळे यांची आज अनुपस्थिती होती. या दोघांची मते विरोधी गटाला जाणार नाहीत किंवा तटस्थ राहतील असा भाजपने दावा केला होता. भाजप 10 विरुद्ध 6 मतांनी जिंकेल आणि भाजपच्या अंबिका पाटील विजयी होतील असा दावाही करण्यात आला होता.

सोशल डिस्टन्सचा मात्र फज्जा-
सोलापूर महानगरपालिकेत आज स्थायी समिती आणि परिवहन समिती निवडणूक होती. यामुळे सर्व पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना महामारीलारोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन वेगवेगळे उपाययोजना करत आहे. मात्र आज शुक्रवारी सोलापूर महापालिकेत कोविड महामारीचे सर्व नियम ढाब्यावर बसवण्यात आले होते.

Last Updated : Mar 5, 2021, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details