सोलापूर - धर्मनिरपेक्ष विद्यार्थी घडवा. येणारी नवीन पिढी ही जातीयवादी नसावी. कारण सध्याच्या केंद्र सरकारमुळे देशातील वातावरण जातीयवादी झाले आहे. तसेच जातीयवादी करणाऱ्या विरोधात सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यास फेसबुक, ट्वीटर अकाऊंट बंद पाडले जात आहेत. त्यामुळे शिक्षकांवर विद्यार्थी घडवण्याची मोठी जबाबदारी आहे. येणारी तरुण पिढी ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
शिक्षकांनो धर्मनिरपेक्ष विद्यार्थी घडवा - आमदार प्रणिती शिंदे
नवीन पिढी ही जातीयवादी नसावी. विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर बनवण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
सोलापुरात पुणे शिक्षक मतदार संघातील आमदार जयंत आसगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचा उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदर प्रणिती शिंदे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत व्यासपीठावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी कार्यक्रमात आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
धर्मनिरपेक्ष विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर
सद्यस्थितीत देशातील वातावरण हे जातीयवादी झाले आहे. या देशात जातीयवादाच्या विरोधात बोलले तर त्यावर दबाव आणला जात आहे. सोशल मीडियावर जातीयवाद विरोधात आपले मत व्यक्त केले तर आपलाच विरोध केला जात आहे. सोशल मीडियावरील खाते देखील बंद केले जात आहे. नवीन पिढी ही जातीयवादी नसावी. विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर बनवण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे.
आमदारांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी
जुळे सोलापुरातील गोविंश्री मंगल कार्यालयाच्या वरील भागात पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले.यावेळी सोलापुरातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : श्रीनगरमध्ये दुसऱ्यांदा 'एअर शो'