महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ

ही यात्रा लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी यात्रा काढण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज पासुन प्रारंभ

By

Published : Jul 31, 2019, 8:36 AM IST

सोलापूर -युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा आज सुरू होत आहे. ३१ जुलै २०१९ ते ४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत हा टप्पा होईल. जळगाव ते नाशिक या पहिल्या टप्प्यात जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, त्यानंतर १ आणि २ ऑगस्टला लातूर, नांदेड व परभणी, ३ ऑगस्टला परभणीचा काही भाग व हिंगोली, ४ ऑगस्टला बीड जिल्ह्यातील विभागांना भेट देऊन आदित्य ठाकरे जनतेचे आशीर्वाद घेणार आहेत.

जनआशीर्वादयात्रेचे स्वरूप -

१) विजय संकल्प मेळावा

२) गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकसभा

३) शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘आदित्य संवाद’ चे आयोजन

४) शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details