सोलापूर -शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील ( MLA Shahajibapu Patil ) यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना 'राजकारणामुळे माझ्या बायकोला नेसायला लुगडं नसल्याची' खंत बोलून दाखवली होती. याच संवादावर राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आमदार शहाजी पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांना लुगडं पाठवण्यात आले आहे. माध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे यांनी सांगितले की, संगोल्याच्या पाटलीन बाईसाठी आम्ही लुगडं पाठवत आहे.
पोस्टाने पाठविले लुगडं -राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर महिला राष्ट्रवादी आघाडीकडून शिंदे गटाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांना साडीचा आहेर पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे. शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून सोलापूरची रेशमी इरकल साडी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांना साडी पाठवण्यात आली आहे.