पंढरपूर : मंगळवेढ्यात टेम्पो आणि कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मुत्यू ( Mangalwedha Accident Three Dead ) झाला आहे. तर चार जण गंभीर ( Mangalwedha Accident Four Injured )जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास दामाजी कारखान्याच्या ( Damaji Sugar Mill Mangalwedha ) रस्त्याजवळ ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूरहुन येणारी कार आणि सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोचा समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये कारमधील जैनुद्दिन काशीम यादगिरे ( वय 40 रा.उमदी ता.जत जि.सांगली ) व मौलाना साजिद खान (वय 45, मुंबई, भिवंडी सध्या रा.उमदी ता.जत जि.सांगली ) यांचा जागीच मृत्यु झाला. तर प्रवीण हिरेमठ यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.