सोलापूर- शहरातील प्रमुख असलेल्या आसरा चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, मागणीसाठी संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये दिवे लावून आंदोलन केले.
सोलापूर शहरातील जूळे सोलापूर हा रहिवाशी भाग म्हणून ओळखला जातो. आसरा चौकातील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने रोज अपघात होत आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा, म्हणून रस्त्यावरील खड्ड्यात दिवे लावून आंदोलन करण्यात आले.
रस्ता दुरुस्तीसाठी खड्ड्यात दिवे लावून 'संभाजी ब्रिगेड'चे आंदोलन हेही वाचा - मलवडीत मुलाला वाचविताना वडील व मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्यामुळे शेकडो नागरिकांना अपघाताचे आमंत्रण मिळत आहे. दिवसेंदिवस आपघाताचे प्रमाण वाढत असले, तरी महानगरपालिका खड्डे बूजविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत असल्याचा आरोप संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी केला.
होटगी रस्त्यावरून सोलापुरात जाण्यास आणि जुळे सोलापुरातून शहरात येण्यास आसरा चौकापुढील पुलाच्या रस्त्याचा वापर होतो. त्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते, पुलावरील रस्ता खराब झाला असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. हा पूल अत्यंत अरुंद असून रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाकडे रस्ता रुंदीकरणाची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती.
हेही वाचा -सांगोल्यात मोहंम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात; मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप
संभाजी ब्रिगेडने खड्ड्यामध्ये झाडे लावून प्रशासनाचा निषेध केला होता. त्यामुळे खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले नसल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.