महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली पंढरीतील रॉबिनहूड आर्मी - pandharpur update

आदिवासीवाडी, रानावाडी, शेवता, अडराई, आंब्याचा माळ ही रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना पंढरपूर येथील रॉबिनहूड आर्मीच्या युवकांकडून मदत करण्यात आली आहे. यामुळे गावांचे पुनर्वसन होण्यास मदत होणार असल्याचीही भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

रॉबिनहूड आर्मी
रॉबिनहूड आर्मी

By

Published : Aug 4, 2021, 12:07 PM IST

पंढरपूर -काही दिवसांपूर्वी कोकणात पावसाने प्रचंड प्रमाणात हाहाकार माजवला होता. शहरे व गावे पाण्याखाली गेली तर काहींचे संसार उद्ध्वस्त झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणाला मदतीचा हात पुढे आला. पंढरपूर येथील रॉबिनहूड आर्मीच्या युवकांकडून रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाच्या मदतीला धावले. गेल्या पंधरा दिवसापासून रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी रॉबिनहूड आर्मीच्या युवकांकडून जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

मदतीसाठी धावली पंढरीतील रॉबिनहूड आर्मी

ग्रामीण भागात मोलाचे कार्य
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते. यात रॉबिनहूड आर्मीच्या युवकांकडून अन्नधान्यापासून ते वैद्यकीय सेवा पुरवण्यापासून मदत केली होती. वतीने गेल्या पंधरा दिवसापासून मदत कार्यात हातभार लावला आहे. आदिवासीवाडी, रानावाडी, शेवता, अडराई, आंब्याचा माळ ही रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांशी संपर्क तुटला होता. पुरामुळे व दरड कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन केले आहे. याचबरोबर गावातील 200 कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

नुकसानग्रस्त गावांना केली मदत
पंढरीतील रॉबिनहूड आर्मी

कोकणातील गावांनाही मदत
पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या कोकणातील चार गावातील पूर परिस्थिती भयावह झाली आहे. या गावांना दळणवळण पुरवणारे रस्तेही वाहून गेले आहेत. यांनाही या ग्रुपने मदत केली आहे. यामुळे गावांचे पुनर्वसन होण्यास मदत होणार असल्याचीही भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details