महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी बरखास्त, नव्याने करणार बांधणी - राजू शेट्टी - News about Swabhimani Farmers Association

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी सोलापूर येथील अधिवेशनात बरखास्त करण्यात आली. येत्या ११ फेबुरवारीपर्यंत प्रदेश कार्यकारणी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

raju-shetty-declared-that-the-state-executive-of-swabhimani-was-sacked
स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी बरखास्त

By

Published : Dec 11, 2019, 10:54 PM IST

सोलापूर - राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी आज बरखास्त करण्यात आली. ही घोषणा पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. गावपातळीपासून देश पातळीपर्यंत आता नव्याने पक्षबांधणी करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा - अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुधाकर महाराज इंगळे, तर सचिव पदी आण्णा महाराज बोधले

सोलापुरात सात रस्ता परिसरात असलेल्या अब्दुलपूरकर मंगल कार्यालयात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात शेट्टी यांनी ही घोषणा केली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, पूजा मोरे,जालिंदर पाटील यांच्यासह राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबतची माहिती देताना रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश पातळीपासून सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहेत. आगामी काळात संघटनेला राजकीय ताकद मिळावी व चळवळ गतीमान करावी यासाठी नव्या कार्यकारणीत तरुणांना जास्ती जास्ती प्राधान्य देण्यात येणार आहे.

स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी बरखास्त

हेही वाचा-शरद पवारांच्या वाढदिवसावरील खर्च राष्ट्रवादी देणार शेतकऱ्यांना

११ जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यकारणी स्थापन करण्यात येणार असल्याचीही माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. यावेळी कार्यकारणी स्थापन करण्यासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आल्याचेही तुपकर यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरच्या यशस्वी लढाया करणाऱ्या पण राजकीय बस्तान बसवण्यात अपयशी ठरलेल्या स्वाभिमानीची आता घटनात्मक बांधणी करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details