सोलापूर- उसाची लागवड केल्यानंतर ऊस कारखान्यात जाईपर्यंत कर्ज काढण्यापासून बिल येईपर्यंत शेतकऱ्यांना मिळेपर्यंत शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात. याबाबत स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांनी शेती करावी की कारखाना ताब्यात घ्यावा याचा सल्ला शरद पवारांनी ( Sharad Pawar ) द्यावा, अशी टीका राजू शेट्टी यांनी शरद पवारांवर केली ( Raju Shetty Criticism on Sharad Pawar ) आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हुंकार बळीराजाचा ही यात्रा सोलापूर येथे आल्यावर राजू शेट्टी यांनी सात रस्ता येथे शासकीय विश्राम गृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही मिनिटांतच ऊस शेतीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच याच ऊस शेतकऱ्यांपासून साखर कारखाने चालतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
प्रसंगी न्यायालयात जाऊ -वर्षानुवर्षे शेतकरी गुलामीचे जीवन जगत आहेत. आज सर्वच उत्पादनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेती मालाचा दर वाढताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत देशातील 300 शेतकरी संघटना एकत्र येऊन हमीभावासाठी लढणार असून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा एल्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला ( Raju Shetty ) आहे.