सोलापूर - वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे साखर परिषद 2022चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन देखील करण्यात आले आहे. या साखर परिषद बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टोला लगावत उपरोधिक सल्ला दिला आहे. खऱ्या अर्थाने साखर परिषदेत आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे होते. या साखर परिषदेचा मूळ कणा असलेला शेतकरी कुठे दिसतो का? यंदाच्या हंगामात जूनपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवायची वेळ का आली याबाबत साखर परिषदेतील नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे राजू शेट्टी सोलापुरात म्हणाले.
Raju Shetti : साखर परिषदेत आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे होते - राजू शेट्टी - साखर परिषद 2022 राजू शेट्टी प्रतिक्रिया
वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे साखर परिषद 2022चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन देखील करण्यात आले आहे. या साखर परिषद बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टोला लगावत उपरोधिक सल्ला दिला आहे.
आत्मपरीक्षण काय व्हावे - सरकारने साखर परिषदेचा आयोजन करण्याअगोदर जून पर्यंत साखर कारखाने का सुरू ठेवावे लागले याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. राज्यातील शेतात उभं असलेलं एकूण ऊस आणि एकूण साखर कारखाने याचा अभ्यास केला पाहिजे. राज्य सरकारने एक वर्षा अगोदर नियोजन केले असते तर, जूनपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवण्याची वेळ कारखानदारांवर आली नसती. एप्रिल मध्ये सर्व गाळप हंगाम संपला असता. याबाबत राज्य सरकारने आत्मपरीक्षण केले पाहिजे असे राजू शेट्टी यांनी माध्यमांना माहिती दिली.
जनतेने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले - शेतकऱ्यांच्या उस पिकाबाबत धोरण राबविताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः धोरणं तयार करावीत. बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांकडे बोट दाखवू नये. तुम्हाला मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे झालीत. ते दोघेही कारखानदार आहेत. त्यांच्या सोयीचे धोरणं तयार करतील. जनतेने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवले, असे राजू शेट्टी म्हणाले.