पुणे - संपूर्ण कोरोना काळात बंद असलेली आणि नुकतीच सुरू झालेली पुणे- सोलापूर एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस 25 दिवसांकरिता रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी सुरू होऊन अवघे 5 ते 6 दिवस झाले होते. त्यातच पुन्हा एकदा ही गाडी बंद झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाने भिगवन वाशिंबे दरम्यान रेल्वे मार्गाच्या दिवशी कामा हाती घेतलेले आहे. या कामामुळे पुणे- सोलापूर एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस ( Pune Solapur Indrayani Express ) सह पुणे- सोलापूर डेमो गाडी देखील बंद करण्यात आली आहे.
24 जुलै ते 18 ऑगस्ट दरम्यान पुणे- सोलापूर डेमो गाडी बंद -पुणे- सोलापूर पुणे- इंद्रायणी एक्सप्रेस 25 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत रद्द राहणार आहे. तसेच भुवनेश्वर पुणे साप्ताहिक एक्सप्रेस 26 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत दर मंगळवारी भुवनेश्वरहून सुटणार आहे. पुणे- भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवारी पुण्याहून सुटणारी गाडी देखील रद्द राहणार आहे.