सोलापूर - अमेझॉन कंपनीने 'ओम' चिन्ह असलेली पायपुसणी व देवी, देवतांची फोटो असलेले अंतवस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशात सुरू केली आहे. हा आमच्या संस्कृतीचा व परंपरेचा अपमान असल्याचे सांगत अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाच्या वतीने पार्क चौक येथे आंदोलन करण्यात आले. अमेझॉन कंपनीच्या नावाची पत्रक जाळून निषेध करण्यात आला. या कंपनीच्या वस्तू विक्रीसाठी सरकारने बंदी आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या अमेझॉन कंपनीच्या पत्रकांची होळी; सोलापुरात निषेध - protest against amazon in solapur
ॲमेझॉन कंपनीने 'ओम' चिन्ह असलेली पायपुसणी व देवी, देवतांची फोटो असलेले अंतवस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशात सुरू केली आहे. हा आमच्या संस्कृतीचा व परंपरेचा अपमान असल्याचे सांगत अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाच्या वतीने पार्क चौक येथे आंदोलन करण्यात आले.
जाणीवपूर्वक अशा गोष्टी करून कंपनीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अनेक कंपन्यांकडून असा प्रयत्न नेहमीच केला जातो, असा आरोप अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे सुधाकर इंगळे महाराज यांनी केला आहे. भारतात सेक्युलर या मानसिकतेमुळे काहीही केलं तरी चालतं, असा समज अनेकांचा झाला आहे. पण ते चालू दिले जाणार नाही, अशा इशारा त्यांनी दिलाय. प्रसिद्धीसाठी आमच्या भावना दुखावून जर कुणी स्वतःचा स्वार्थ साधत असेल आणि आमच्या परंपरेचा अपमान करत असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
अमेझॉन कंपनीवर भारतात बंदीची मागणी
ॲमेझॉन कंपनीचा अखिल भाविक वारकरी मंडळाच्यावतीने जाहीर निषेध करून अमेझॉन नावाच्या पत्रकांची यावेळी होळी करण्यात आली. अमेझॉन कंपनीवर सर्वांनी बहिष्कार टाकून खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले. या अमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालण्याची मागणी ईमेलद्वारे मुख्यमंत्री आणि राज्य व पंतप्रधान कार्यालयला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुधाकर इंगळे महाराज (अध्यक्ष), बळीराम जांभळे (सचिव), जोतिराम चांगभले (जिल्हाध्यक्ष अध्यक्ष), जगन्नाथ सुतार, बजरंग डांगे, कृष्णदेव बेलेराव, तुकाराम जांभळे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.