सोलापूर : गरीब कल्याण संमलेनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित (Union Minister Athavale is chief guest) होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा (Prime Minister Narendra Modi) या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना आठवले यांना झोप अनावर झाली आणि भर कार्यक्रमात आठवले (Union Minister Ramdas Athavale) यांना डुलक्या लागू लागल्या.
भर कार्यक्रमात आठवलेंच्या डुलक्या : सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेन आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी (Prime Minister Narendra Modi online participant) झाले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन (Narendra Modi's Guidance to Farmers) केले. याच कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. मोदींचे भाषण सुरू असतानाच भर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झोप अनावर झाली. त्यांना काही काळासाठी डुलकी लागली होती.