सोलापूर -पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी प्रचार करणे हे एकच काम पंतप्रधान मोदी यांना राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उठसूट पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचाराला जात आहेत. देशाच्या एका पंतप्रधानाने एक दोन वेळा प्रचार केला तर ठीक आहे, पण उठसूट त्याच विषयावर बोलणे किंवा त्याचा प्रचार करणे हे देशाच्या पंतप्रधानांना शोभणारा नव्हे. यामुळे मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
हेही वाचा -'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'
पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर सोलापूर दोऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
नरेंद्र मोदी हे एका गावचे प्रधान असल्यासारखे वागत आहेत-
पश्चिम बंगाल येथे विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये 17 वेळा दौरा करतात. हे पंतप्रधान पदाला शोभणारे नाही. पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य कार्यकर्ते देखील टीका करत आहेत. भाजपने याचा विचार केला पाहिजे. तसेच एका छोट्याशा गावचे प्रधान असल्यासारखे ते पश्चिम बंगाल निवडणुकीत प्रचार करत आहेत.