महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वीज बिल माफीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर प्रहार संघटनेचा ठिय्या - mahavitaran office in solapur

वीज बिल माफीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला घेराव घालण्यात आला होता.

Prahar Sanghatana agitation
महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे आंदोलन

By

Published : Mar 22, 2021, 8:08 PM IST

Updated : Mar 22, 2021, 8:21 PM IST

सोलापूर -वीज बिल माफीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला घेराव घालण्यात आला होता. तसेच संघटनेच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गेट समोरच ठिय्या केला होता. तबल दोन ते तीन तास हे आंदोलन चालल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज बिल वसुलीसाठी बाहेर जाता आले नाही. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावल्यामुळे कोणतीही हुल्लडबाजी झाली नाही. पण सोशल डिस्टन्सचा पार फज्जा उडाला होता.

महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर प्रहार संघटनेचा ठिय्या

हेही वाचा -कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला

डीपीमधून विद्युत पुरवठा तोडला जात असल्याची तक्रार-

महावितरणचे कर्मचारी हे वीज बिल वसुलीसाठी थेट डीपीमधून विद्युत पूरवठा खंडित करत आहेत. त्यामुळे वीज भरलेल्या वीज ग्राहकांना देखील याचा मोठा त्रास होत आहे. तसेच लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीज बिल लावण्यात आली आहेत. ती कमी झालीच पाहिजे असा पवित्रा घेत प्रहार शेतकरी संघटनेने पवित्रा घेतला होता.

ऊस कारखानदारांनी एफआरपीची रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाहीत

सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना उसाची एफआरपीची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांकडे पैसाच नसल्याने वीज बिल भरायची कशी. राज्य सरकारने व वीज महावितरण विभागाने शेतकऱ्यांची शेती पंपाचे वीज पूरवठा खंडित करू नये अशी मागणी यावेळी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

पठाणी वसुली बंद करा-

सोलापूर शहर व जिल्ह्यात वीज वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पठाणी वसुली करत आहेत. ही पठाणी वसुली बंद करा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली. आणि ही वसुली जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा यावेळी प्रहारने घेतला होता.

दोन दिवसांच्या लेखी आश्वासनामुळे आंदोलन थांबले-

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचे लेखी आश्वासन दिले शेतकऱ्यांना व घरगुती वीज ग्राहकांना दोन दिवसांत थकीत वीज बिल भरावे लागणार. दोन दिवसाच्या लेखी आश्वासन नंतर पोलिसांनी प्रहार संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताबडतोब अटक केले. आणि आपत्ती व्यवस्थापनाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा -खंडणीप्रकरणाचे लोकसभेत पडसाद; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक

Last Updated : Mar 22, 2021, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details