महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संजय राऊतांच्या समर्थनार्थ सोलापुरात शिवसेनेकडून पोस्टरबाजी

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवसेनेच्या वतीने शहर उपप्रमुख प्रताप चव्हाण, विजय पुकाळे यांनी भर बाजारपेठेत संजय राऊत यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावून भाजप व किरीट सोमैयाचा विरोध केला आहे.

Sanjay Raut Poster display Shiv Sena Solapur
संजय राऊत पोस्टर सोलापूर शिवसेना

By

Published : Feb 15, 2022, 5:44 PM IST

सोलापूर - भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना टार्गेट करून त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील प्रकारानंतर ते जास्त बोलत आहेत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवसेनेच्या वतीने शहर उपप्रमुख प्रताप चव्हाण, विजय पुकाळे यांनी भर बाजारपेठेत संजय राऊत यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावून भाजप व किरीट सोमैयाचा विरोध केला आहे.

माहिती देताना शिवसेनेचे उप प्रमुख आणि शहर संपर्क प्रमुख

हेही वाचा -Vishal Phate Scam : विशाल फटे प्रकरणातील फसवणुकीचा आकडा 100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता

भाजपने सत्तेवर असताना अनेक घोटाळे केली -

भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांनी अनेक घोटाळे केले. त्यांचे घोटाळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी बाहेर काढावे, असे सोलापूर शिवसेनेचे प्रताप चव्हाण यांनी आवाहन केले आहे. शिवसेनेने भाजपला डावलून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापण केल्यापासून भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

साडे तीन नेते दररोज आरोप करत असतात -

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून राज्यातील साडे तीन नेते म्हणजेच चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमैया, आशिष शेलार हे दररोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. संपूर्ण शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचेही प्रताप चव्हाण यांनी स्पष्ट केले.

किरीट सोमैया यांचे कपडे फाडू -

सोलापुरातील शिवसैनिक अतिशय आक्रमक झाले असून किरीट सोमैया हे जर सोलापुरात आले तर, पुण्यापेक्षा बिकट अवस्था त्यांची करू आणि त्यांचे कपडे फाडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. सोलापुरातील नवी पेठ येथे भर बाजारपेठेत शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावून भाजप आणि किरीट सोमैया यांचा निषेध केला.

हेही वाचा -Chandrabhaga River Water is Dangerous : चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक, भूजल विभागाचा अहवाल

ABOUT THE AUTHOR

...view details