सोलापुरात पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त - solapur police news
परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी कार्तिक सत्य साई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सर्व कंटेनर सहित पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये हिरा पान मसाला, रॉयल तंबाकू, दोन्ही कंटेनर असा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आले ,सर्व खात्री करून तालुका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.
सोलापूर -सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 1 कोटी 74 लाख रुपयांचा गुटखा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. दोन कंटेनर भरून गुटख्याचा मुद्देमाल हा कर्नाटकातून उस्मानाबाद किंवा तुळजापूर या ठिकाणी जात होता. पण सोलापूर पोलिसांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यच्या हद्दीत हा साठा पकडला आहे. हा मुद्देमाल नेमका कुठून आला, आणि कुठे चालला होता याचा मूळ मालक कोण आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती परीक्षाविधींन आयपीएस अधिकारी कार्तिक सत्यसाई व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. या कारवाईमुळे सोलापूर आणि आजूबाजूच्या दोन ते तीन जिल्ह्यातील गुटखा माफियांची धाबे दणाणली आहेत.
महामार्गावर पाकणी हद्दीत पकडले दोन कंटेनर -सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तालुका पोलीस पोलीस ठाण्याच्या प्रभारी आयपीएस अधिकारी कार्तिक सत्यसाई यांना एका खबऱ्याने माहिती दिली होती. कर्नाटक राज्यातुन मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन जाणार आहेत. पोलिसांचा गुप्तचर हा कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात येई पर्यंत दोन्ही कंटेनरच्या मागावर होता. सोलापूर महामार्गावर असलेल्या रिंग रोड मार्फत हे दोन्ही कंटेनर बाहेरून तुळजापूर किंवा उस्मानाबाद येथे जाणार होते. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत असलेल्या पाकणी गावच्या शिवारात 20 मे रोजी मध्यरात्री (एम एच 46 ए एफ 6117) व (एच आर 38 ए एक्स 8051) ही दोन्ही जडवाहने आली.पोलिसांनी ताबडतोब त्यांना अडवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये सुगंधीत तंबाकू, गुटखा याची पोती आढळून आली. त्याबाबत कंटेनर चालकांना विचारणा केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे.
पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला-परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी कार्तिक सत्य साई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सर्व कंटेनर सहित पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये हिरा पान मसाला, रॉयल तंबाकू, दोन्ही कंटेनर असा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आले ,सर्व खात्री करून तालुका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गुटखा माफिया मात्र मोकाटच -सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध कंपनीचे गुटखा अनेक दुकानांत आणि पान टपरी येथे विक्री होतो. हा देखील मुद्देमाल बाहेर राज्यातून सोलापुरात येतो. आणि सोलापुरात अनेक गुटखा माफिया सक्रिय आहेत. यांवर कारवाई कधी करणार असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. कारण अनेक गुटखा माफियांचे गोडावून सोलापूर ग्रामीण भागात आहेत. या ठिकाणी कधी कारवाई होणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आणि आज जो मुद्देमाल जप्त केला आहे, हा सोलापूर येथील गुटखा माफियांचा नसून, बाहेरील जिल्ह्यातील आहे.
शनिवारी दुपारी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली -तालुका पोलिसांनी 20 मे रोजी रात्री कारवाई केली. आणि शनिवारी 21 मे रोजी दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अधिकृत माहिती दिली. यामध्ये परीक्षा विधीन आयपीएस अधिकारी कार्तिक सत्यसाई, एपीआय प्रवीण संपागे, संजय देवकर, आनंद चमके, नागेश कोणदे, गणराज जाधव, रवींद्र साबळे, सिद्धनिंगप्पा बिराजदार, कानडे आदींनी महत्वाची कामगिरी बजावली.