महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चोराने चोरलेल्या दुचाकी लपवल्या काटेरी झुडपात; 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त - दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

दुचाकीवरुन वेगाने जाणार्‍या संशयित व्यक्तीचा पोलिसांनी पाठलाग केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

Police arrested thief
दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक

By

Published : Mar 19, 2021, 4:43 PM IST

Updated : Mar 19, 2021, 5:06 PM IST

सोलापूर - दुचाकीवरुन वेगाने जाणार्‍या संशयित व्यक्तीचा पोलिसांनी पाठलाग केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी काटेरी झुडपात लपवून ठेवल्या होत्या. सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहा दुचाकी हस्तगत केल्या. त्यांची अंदाजे किमत 1 लाख 90 हजार आहे. मोहम्मद ईस्माईल रब्बानी (वय 42, रा. गुलबर्गा कर्नाटक) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय पांडुरंग उपरे (रा. सदर बझार, सोलापूर) यांनी तक्रार दिली होती.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -उरी, पठाणकोट,व पुलवामा हल्ल्याचा काय तपास केला? सामनातून एनआयएला विचारणा

पोलिसांनी पाठलाग करून शहरातील महावीर चौकात पकडले-

16 ते 17 मार्चच्या दरम्यान, उपरे यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने सदर बझार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करीत होते. त्यावेळी महावीर चौकातून संशयित व्यक्ती वेगाने दुचाकीवरुन गेला. त्याचा पथकाने पाठलाग केला. त्याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दुचाकी चोरल्याचे सांगितले.

संभाजी तलावाच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपात लपवल्या होत्या दुचाकी-

पोलिसांनी संशयीत चोरट्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शहरातील विविध भागातुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे संभाजी तलावाच्या परिसरातील काटेरी झुडपात त्याने चोरी केलेल्या दुचाकी ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.Conclusion:*डीबी पथकाने खबऱ्यामार्फत माहिती काढून महावीर चौकात सापळा लावला होता-

सदर बझार पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने एका खबऱ्या मार्फत माहिती मिळवली होती.पण नेमका हाच संशयीत चोरटा आहे हे माहीत नव्हते.शहरातील महावीर चौकात पोलिसांनी सापळा लावला होता.महावीर चौकातुन संशयीत चोरटा दुचाकीवर वेगात जात होता.पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.हि कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार ओमप्रकाश मडवळी, अतिक नदाफ, पोलीस नाईक खाजपा आरेनवरु, राहुल आवारे, नितीन गायकवाड, सागर सरतापे, विठ्ठल काळजे, रामा भिंगारे, सचिन गुजरे व अमोल उगले यांनी केली.

हेही वाचा -महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय

Last Updated : Mar 19, 2021, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details