महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अखेर नववधूचा जीव पडला भांड्यात, चोरीला गेलेल्या दागिन्यासह चोर 24 तासांत ताब्यात - दागिने पोलिसांनी शोधून दिले

खासगी बसने मुंबईहून हुमनाबादकडे लग्नासाठी निघालेल्या नववधूचे सोन्याचे दागिने आणि पैशाची बॅग चोरीला गेली होती. नववधू व तिच्या नातेवाईकांनी याबाबत ताबडतोब सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 15 जून, 2022 रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर सोलापूर पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. लग्नापूर्वी मिळालेल्या साहित्य व दागिन्यामुळे नववधू तिच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

नववधूचा जीव भांड्यात पडला
नववधूचा जीव भांड्यात पडला

By

Published : Jun 19, 2022, 9:23 AM IST

Updated : Jun 19, 2022, 12:27 PM IST

सोलापूर- खासगी बसने मुंबईहून हुमनाबादकडे लग्नासाठी निघालेल्या नववधूचे सोन्याचे दागिने आणि पैशाची बॅग चोरीला गेली होती. नववधू व तिच्या नातेवाईकांनी याबाबत ताबडतोब सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 15 जून, 2022 रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर सोलापूर पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. लग्नापूर्वी मिळालेल्या साहित्य व दागिन्यामुळे नववधू तिच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

माहिती देताना पोलीस अधिकारी

दिलीप उर्फ धनुष रामन्ना माने (वय 24 वर्षे, रा. बसवकल्याण, जि. बिदर, राज्य कर्नाटक) ,असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आले असून तो पोलीस कोठडीत आहे. चोरी केलेली सर्व दागिने पोलिसांना परत दिले आहे. दागिने परत मिळाल्याने अखेर त्या नववधूचा व तिच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.

नववधू व तिचे नातेवाईक लग्नासाठी मुंबईहुन हुमनाबादकडे निघाले होते -15 जूनला एका खासगी बसने नववधू व तिचे नातेवाईक,आई वडील,भाऊ मुंबई ते हुमनाबादकडे लग्नासाठी जात होते. लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य व 16 तोळ्यांची दागिने असलेली पिशवी सोबत होती. संशयीत चोरट्याची त्यावर नजर पडली. प्रवास करत असताना त्याने अचानकपणे पोटात दुखत असल्याचा बहाणा करून पुढे हुमनाबादकडे न जाता सोलापूर येथे उतरला. संशयीत चोरट्याने दागिने व रोख रक्कम असलेले एकूण 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली पिशवी हातचलाखी करत लंपास केली. काही अंतर पुढे गेल्यावर नववधूच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिसांना याबाबत माहिती देत चोरीची तक्रार दिली.

गुन्हे शाखेने तपास करत नववधूचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला -गुन्हे शाखेने याचा तपास करत खासगी ट्रॅव्हल्स कंपनीशी संपर्क साधून चालक व वाहक यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. सोलापूर येथे पोट दुखीचे कारण देऊन उतरणाऱ्या प्रवाशाची संपूर्ण माहिती घेतली. सांगितलेल्या वर्णनानुसार संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांना एका खबऱ्याने माहिती दिली की, एक संशयीत व्यक्ती अक्कलकोट रोडवर असलेल्या पुंजाळ मैदानाजवळ संशयितरित्या फिरत आहे. त्याला ताब्यात घेऊन कसून तपास केला आणि त्याजवळ असलेल्या पिशवीची सर्व झडती घेतली. त्यामध्ये दागिने आणि रोख रक्कम आढळून आले. त्याला खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली आणि नववधूचा सर्व मुद्देमाल पोलिसांकडे दिला.

हेही वाचा -Corona Update India : नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोना लस लवकर होणार उपलब्ध, देशात 24 तासांत १३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

Last Updated : Jun 19, 2022, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details