महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PFI Threatens BJP MLA : पीएफआयकडून भाजपच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची धमकी ; क्राईम ब्रँचकडे तपास - पीएफआयकडून भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

सोलापूर शहरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयकडून जीवे मारण्याच्या धमकीचे (PFI threatens to kill MLA Vijay Kumar Deshmukh) पत्र पोस्टाने प्राप्त झाले आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश देत क्राईम ब्रँचकडे तपास सोपविला (Crime Branch investigation) आहे.

BJP MLA Vijay Kumar Deshmukh
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख

By

Published : Oct 8, 2022, 7:24 AM IST

सोलापूर :सोलापूर शहरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयकडून जीवे मारण्याच्या धमकीचे (PFI threatens to kill MLA Vijay Kumar Deshmukh) पत्र पोस्टाने प्राप्त झाले आहे. यामुळे शहरात व भाजप गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश देत क्राईम ब्रँचकडे तपास सोपविला (Crime Branch investigation) आहे. मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या अक्षरात १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र आमदार विजयकुमार देशमुख यांना पाठवले आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी 6 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त यांना भेटून पत्र पोलिसांच्या हवाली केले आहे. याची गंभीर दखल घेत, आलेल्या पत्राबाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहे.


पीएफआयकडून धमकी पत्र -राज्यात व देशभरात पीएफआय या संघटनेच्या ठिकठिकाणीच्या कार्यालयावर एनआयएचे छापे पडले आहे.पीएफआयच्या अनेकनकार्यकर्त्यांच्या राहत असलेल्या घरावर छापे मारून प्रतिबंधात्मक कारवाई केली. सोलापुरात सुद्धा पीएफआयच्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यावर कारवाई करून करून त्याला ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले, असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना (PFI threatens to kill Solapur BJP MLA) दिली.


पोलीस आयुक्तांना माहिती दिली -भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी (BJP MLA Vijay Kumar Deshmukh) 6 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची भेट घेतली. आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या हस्तलिखिता मध्ये १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र विजय देशमुख यांना पाठवलेले आहे.

क्राईम ब्रँचकडे तपास -भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पत्रात पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्याकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली (PFI threatens BJP MLA) आहे. या पत्राची पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी गांभीर्याने दखल घेऊन, या संदर्भात क्राईम ब्रँचला चौकशीचे आदेश दिले आहेत. क्राईम ब्रँचचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी माहिती देताना सांगितले की, आमच्याकडे तपास आला आहे. हे पत्र कुठून आले, कुणी पाठवले याचा लवकरच तपास लावून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details