सोलापूर -कराड डेपोची बस गुरुवारी ( 9 मे ) दुपारी सोलापूर हुन उस्मानाबादला निघाली होती. सोलापूर बस स्थानकातून अनेक प्रवाशी उस्मानाबाद आणि तुळजापूरकडे निघाले होते. मात्र, सोलापूर बसस्थानकातून काही अंतरावर गेल्यावर तुळजापूरकडे जाणाऱ्या एका प्रवाशाने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब कंडक्टर व ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत एसटी बस थेट सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली. प्रवाशाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु केलं आहे. सिद्धेश्वर गुरुराज स्वामी (वय 53 वर्ष, द्वारका नगरी, विजापूर रोड, सोलापूर शहर), असे प्रवाशाचे नाव ( passenger poisoned in st bus at solapur ) आहे.
कंडक्टरच्या आले लक्षात - कराड डेपोची बस सोलापूर बस स्थानकात गुरुवारी 9 जून रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. 1.30 वाजण्याच्या सुमारास कराड ते उस्मानाबाद बस सोलापूर बस स्थानकातून उस्मानाबादकडे निघाली. 2 किमी अंतर गेल्यावर मागील सीटवर बसलेले सिद्धेश्वर स्वामी या प्रवाशास मोठा खोकला येत होता. तसेच, बसमध्ये विषारी औषधाचा उग्र वास पसरल्याने एक प्रवाशी उलट्या करत असल्याचे जी.एम.कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सोलापूर बस स्थानक प्रमुखाला ही माहिती देत रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं.