सोलापूर- केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सध्या केंद्रीय सहकार मंत्रीपदही आहे. आता सहकार क्षेत्रातील सर्व सहकार नीट झाल्या शिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडा वरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य माजी आमदार पाशा पटेल यांनी केले आहे. बांबू शेतीच्या मेळाव्यासाठी पाशा पटेल हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत आमदर सुभाष देशमुखही उपस्थित होते. मंद्रुप येथे मेळाव्यात मार्गदर्शन करून पाशा पटेल आणि सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर टीका केली.
शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचे कण असेपर्यंत सरकार हमी घेते
केंद्र सरकारने 2020 मध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी कायदा पारित केला आहे. यावर पाशा पटेल यांनी म्हणाले, केंद्र सरकार या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन कायद्यानुसार, शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचे कण असेपर्यंत शेती मालाला 'एमएसपी'नुसार हमीभाव देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. 2014 पूर्वीच्या तिप्पट खरेदी केंद्र सरकार करत असल्याचे माजी आमदार पाशा पटेल यांनी सांगितले.