महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'माऊली' या एका शब्दांत समावलेला पंढरीचा दिंडी सोहळा

संतांच्या दिंड्या पुढं जात असतात एक अनामिक जग या सोहळ्यासोबत चाललेले असते. कुणाला कांही मागाये असेल, द्यायचे असेल तर तुम्ही फक्त माऊली म्हणा. ती गोष्ट तुम्हाला मिळेल. फक्त देण्या-घेण्यापर्यंतच नाही, तर एखादी चूक झाली अन तुम्ही माऊली म्हटले तर तुमचा गुन्हाही माफ करायला लावण्याची ताकद वारकऱ्यांच्या माऊली या शब्दांत आहे.

By

Published : Jul 11, 2019, 8:44 PM IST

'माऊली' या एका शब्दांत समावलेला पंढरीचा दिंडी सोहळा

सोलापूर -संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा देहू-आळंदीहून सुरु होणारा अन् पंढरीत पर्यत येणारा दिंडी सोहळा एक अभ्यासाचा बनला आहे. अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास, लाखांवर गर्दी, त्यातही स्त्री-पुरुष, अबाल वृद्ध आणि अपरिचितांचा हा मेळा. तरीही माऊली या एका शब्दाने परस्परांविषयी निर्माण केलेला विश्वास अन् वारकरी संप्रदायाची परंपरा हा सोहळा लिलया पार पाडते.

'माऊली' या एका शब्दांत समावलेला पंढरीचा दिंडी सोहळा

संतांच्या दिंड्या पुढं जात असतात एक अनामिक जग या सोहळ्यासोबत चाललेले असते. कुणाला काही मागायचे असेल, द्यायचे असेल तर तुम्ही फक्त माऊली म्हणा. ती गोष्ट तुम्हाला मिळेल. फक्त देण्या-घेण्यापर्यंतच नाही, तर एखादी चूक झाली अन तुम्ही माऊली म्हटले तर तुमचा गुन्हाही माफ करायला लावण्याची ताकद वारकऱ्यांच्या माऊली या शब्दांत आहे. म्हणून मग संवादाच सर्वात मोठं साधन म्हणून माऊली या शब्दाला जगावेगळी किंमत या दिंडीसोहळ्यात आहे. यामुळे आता ही दिंडी गावाकडच्या अशिक्षितांची राहिली नाही. तिथे आता तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या विठ्ठल भक्तांची मांदियाळी पाहायला मिळेल.


मा म्हणजे मातृत्व, ऊ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता या विग्रहातून माऊली या शब्दाचा जन्म झाला. त्याच शब्दांने पंढरीच्या पांडुरंगाचा हा सोहळा सर्वार्थाने व्यापून टाकलाय. मग चला तर येताय ना माऊली वारीला....पांडुरंगाच्या दर्शनाला.

ABOUT THE AUTHOR

...view details