पंढरपूर -आपली हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी गावखेड्यातली अनेक मुलं रात्रंदिवस कष्ट घेताना दिसतात. त्यात काही जणांना यश येतं, तर काहीजण अपयशाने खचूनही जातात. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहीलं तर यशाला कोणीही रोखू शकत नाही. याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील बार्डी ( Pandharpur Taluka Bardi ) येथील कृष्णा हनुमंत माळी याने नुकतीच सीए ( CA Exam Success Story) म्हणजे बँकिंग क्षेत्रातली सर्वात मोठी चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा ( Chartered Accountant Exam ) उत्तीर्ण केली आहे. कृष्णाचे प्राथमिक शिक्षण बार्डी येथील त्याच्या राहत्या गावीच झाले. नंतर भोसे व करकंब येथे माध्यमिक शिक्षण तर महाविद्यालयिन शिक्षण पुणे येथून पूर्ण केले आहे.
पदवीचे शिक्षण घेत असतानाच सीएची पूर्वतयारी -कृष्णाचं उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ( Karmaveer Bhaurao Patil College ) येथे झाले. नंतर पुण्यात पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने 'सीए'ची पूर्वतायरीही सुरू केली होती. सीए होण्याच्या या प्रयत्नात कृष्णाला तीन वेळा अपयशालाही सामोरं जावे लागले. मात्र तो खचला नाही. त्याच्या ध्येयापासून तो किंचीतही दूर गेला नाही. अपयश आलं की काही दिवस गावाकडं राहणं, शेतात रमनं आणि पुन्हा जिद्दीनं तयारीला लागणं ही त्याची सवय होती.