सोलापूर : राज्यामध्ये सुगंधी सुपारी व गुटखा या सारखे मादक पदार्थांच्या वापर व विक्रीवर बंदी असताना देखील अनेक ठिकाणी याची अवैधपणे चोरून विक्री केली जाते. पंढरपूर पोलिसांनी मोठी कारवाई ( Pandharpur Crime Branch action ) करत कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला असून यामध्ये ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडल्याची ( 44 lac rupee goods seized ) माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख सपोनी सी. व्हि.केंद्रे यांनी दिली आहे.कर्नाटकातून आलेला हा गुटखा सांगोला मार्गे टेंभुर्णी कडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असता, त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना देण्यात आली.गुटखा घेऊन जाणारा ट्रक पंढरपूर येथील अहिल्या पुलाजवळ गुन्हे शाखेच्या वतीने पकडण्यात आला आहे.
Pandharpur Crime Branch action : पंढरपूर गुन्हे शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर पोलिसांनी मोठी कारवाई ( Pandharpur Crime Branch action ) करत कर्नाटक येथून टेंभुर्णी कडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला असून यामध्ये ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडल्याची ( Action against illegal Gutkha truck ) माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख सपोनी सी. व्हि.केंद्रे यांनी दिली आहे.कर्नाटकातून आलेला हा गुटखा सांगोला मार्गे टेंभुर्णी कडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असता त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना देण्यात आली.गुटखा घेऊन जाणारा ट्रक पंढरपूर येथील अहिल्या पुलाजवळ गुन्हे शाखेच्या वतीने पकडण्यात आला आहे.
गुन्हे शाखेची कारवाई - एम.एच.09 सीए 6330 या क्रमांकाचा ट्रक संशयरीत्या जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली तेव्हा संबंधित ट्रकची तपासणी केली असता, त्या ट्रक मध्ये गुटख्याची पोती आढळून आली आहेत. पोलिसांनी ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनास कळविले आहे. या ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वि सातपुते, (Superintendent of Police Tejaswi Satpute )अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सी. व्ही.केंद्रे, दत्तात्रय आसबे, पोलीस कॉन्स्टेबल शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपिन चंद्र ढेरे, राजेश गोसावी, पोलीस नाईक सुनील बनसोडे, दादा माने, सुजित जाधव, समाधान माने ,राकेश लोहार ,सचिन हेंबाडे ,सचिन इंगळे यांनी केली आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त -गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून 27,60,000 रुपये किमतीची हिरा पान मसाल्याची 120 पोती व 6,90,000 रुपयांची तीस पोती तंबाखू यासोबतच दहा लाख रुपये किमतीचा मालवाहतूक ट्रक असा एकूण 44,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (44 lac rupee goods seized ) केला आहे.