सोलापूर - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि ग्राहकांची वीज बिल जमा करत बसावी, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. वाढीव वीज बिलासंदर्भात सोमवारी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. वीज महावितरण कंपनीवर उर्जामंत्र्यांचा विश्वास आहे, पण जनतेवर नाही. राज्य शासनाने 100 युनिट वीज मोफत देण्याच्या अश्वासनावरून यु-टर्न घेतला आहे. वीज बिलात सवलत नाही, काहीही मदत नाही तसेच सक्तीने वीज बिल वसुलीसाठी कारवाई सुरू केली जाणार आहे, ही तर ठाकरे सरकारची जबरदस्ती आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर शुक्रवारी सोलापुरात आले होते. सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत वाढीव वीज बिल संदर्भात ऊर्जा मंत्री यांवर टीका केली. ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि वीज बिला संदर्भात स्वतः वीज महावितरण कार्यालयात जाऊन काम करावे, असा टोला त्यांनी लगावला.
सोमवारी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन -
ठाकरे सरकार टोलवाटोलवी करत आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि अर्थमंत्री हे तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ शकतात. पण या सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. वाढीव वीज बिला संदर्भात भाजपाची भूमिका अतिशय आक्रमक आहे. येत्या सोमवारी राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन होणार आहे. त्यामुळे सरकारला जनतेची काळजी असेल तर तात्काळ वीज बिलासाठी 5 हजार कोटींची आर्थिक मदत करावी किंवा पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
सरकारला वर्ष उलटूनही दिलासा नाही -
ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आले तरी, जनतेला कुठल्याही प्रकारे दिलासा मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना मदत मिळाली, ना बेरोजगाराना रोजगार मिळाले, वीज बिलांमध्येही सवलत मिळाली नाही. त्यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, खासदार जय सिद्धेश्वर महस्वामी शिवाचार्य, महापौर श्री कांचना यंनम, भाजप शहर विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
नितीन राऊतांचा भाजपवर आरोप -
भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरण डबघाईला