सोलापूर - कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदाच्या वर्षी सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची दिवसभर वर्दळ होती. भाविकांनी शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संसर्गाने श्रावण महिन्यात सिद्धेश्ववर मंदिरात जाण्यासाठी अनेक निर्बंध होते. यंदाच्या वर्षी सर्व निर्बंध मुक्त झाल्याने भाविकांना मनसोक्त दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले झाले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्ववर महाराजांच्या मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
श्रावणी सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची दिवसभर गर्दी - solapur siddheshwar temple
ऑगस्ट पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्ववर महाराज यांच्या मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पहाटे पासून काकडा आरती पासून सुरुवात झाली.त्यानंतर महाआरती झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरात सोलापूर,विजापूर,गुलबर्गा,अक्कलकोटसह आदी भागातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रावणी सोमवारी पहाटे पासून भाविक दाखल -1 ऑगस्ट पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्ववर महाराज यांच्या मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पहाटे पासून काकडा आरती पासून सुरुवात झाली.त्यानंतर महाआरती झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरात सोलापूर,विजापूर,गुलबर्गा,अक्कलकोटसह आदी भागातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी शिवयोगी सिद्धेश्ववर महाराजांच्या मंदिरात पालखी प्रदक्षिणा आणि रात्री 10 वाजता महाआरती संपन्न असल्याची माहिती मंदिराचे पुजारी हब्बू यांनी दिली.