सोलापूर -आषाढी एकादशी ( Ashadi Ekadashi ) यात्रेसाठी पंढरी सजली आहे. आज ( 9 जुलै ) सर्व पालख्यांचं पंढरपुरात आगमन झालं आहे. रविवारी आषाढी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. जवळपास 15 लाखांचा विठ्ठल भक्तांचा महासागर ( Ocean of Vitthal devotees ) पंढरपुरात दाखल झाला आहे. चंद्रभागेत स्नानासाठी एकच गर्दी झाली आहे.आळंदी, देहू आणि महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातुन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. नामदेव पायरीसोबत ते विठुरायाचं दर्शनही घेत आहेत. चंद्रभागेत एनडीआरएफचं पथक वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.
नामदेव पायरी पर्यंत लाखोंचा जनसमुदाय -आळंदी, देहू व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेले लाखो वारकरी आज आषाढ वारीला पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. लाखोंच्या संख्येने नामदेव पायरीजवळ विठ्ठल व रुक्मिणी भक्त ( Ocean of Vitthal devotees ) आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचले आहेत.