सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या आजी व माजी असे एकूण 13 विद्यार्थिनी एनटीपीसीच्या बालिका सशक्तिकरण मोहिमेत ( Girl Empowerment Campaign ) महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. एक महिना चालणाऱ्या या उपक्रमात 40 शालेय विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी त्यांच्यावर मॉनिटरिंग करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
Girl Empowerment Campaign : एनटीपीसी'च्या बालिका सशक्तिकरण मोहिमेत सोलापूर विद्यापीठाच्या तेरा विद्यार्थिनींची मॉनिटरिंग - सामाजिक उत्तरदायित्व योजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या आजी व माजी असे एकूण 13 विद्यार्थिनी एनटीपीसीच्या बालिका सशक्तिकरण मोहिमेत ( Girl Empowerment Campaign ) महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
एनटीपीसीतर्फे 40 विद्यार्थीनीना प्रशिक्षण-
फताटेवाडी येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्प यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून शालेय विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ एनटीपीसीला सहकार्य करणार आहे. फताटेवाडी, होटगी स्टेशन आणि आहेरवाडी या प्रकल्पग्रस्त गावातील पाचवीच्या एकूण 40 विद्यार्थिनींना एक महिना कालावधीत संपूर्णपणे प्रशिक्षित केले जाणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या 13 विद्यार्थिनींना इंटर्नशिपची संधी
तज्ञ व्यक्तींकडून व सर्व दृष्टिकोनातून शिक्षण, क्रीडा, सामान्य ज्ञान आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण संपूर्णतः निवासी असणार आहे. यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या तेरा विद्यार्थिनींनी या शालेय विद्यार्थ्यांनीना प्रशिक्षणाबरोबरच त्यांच्यावर मॉनिटरिंग करणार आहेत. सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थिनींनाही एक प्रकारची चांगली संधी या माध्यमातून मिळाली आहे. विद्यापीठातील या विद्यार्थिनींचे इंटर्नशिपही पूर्ण होणार आहे. सोबतच त्यांना मानधनही मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 4 मे 2022 ते दि. 4 जून 2022 या कालावधीत हे निवासी प्रशिक्षण शिबीर पार पडणार आहे.
हेही वाचा -Solapur University Budget: अखेर सोलापूर विद्यापीठाचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर, अगोदर केले होते नामंजूर