सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अट्टल दरोडेखोरास अटक केले आहे. हा दरोडेखोर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दरोडे, घरफोडी करत होता. त्यावर तब्बल 32 गुन्हे रजिस्टर असून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यासोबत आठ दरोडेखोरांवर गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुखदेव धर्मा पवार(वय 55 वर्ष, रा, होटगी, ता दक्षिण सोलापूर) अंबादास शंकर गायकवाड(रा होटगी, ता दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यासोबतच असलेल्या आठ दरोडेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीस 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती संपल्यानंतर आज न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली.
महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दरोडे घालणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास ठोकल्या बेड्या - notorious robber in maharashtra
आठ दरोडेखोरांचा तपास सुरू असून त्यामध्ये सुरेश धर्मा पवार,राजू रज्जूलाल पवार बापू शंकर काळे राजू पवारचा जावई सोहेम, विनोद बापू पवार,परसु काळे (सर्व रा, होटगी, ता दक्षिण सोलापूर),गिरमल उर्फ गिरमा अंबादास काळे(रा मैनदर्गी, अक्कलकोट, सोलापूर),गोविंद संजय काळे(रा हनमगाव, दक्षिण सोलापूर) हे आठ दरोडेखोर फरार आहेत. त्यांचा तपास सुरू आहे, लवकरच त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
![महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दरोडे घालणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास ठोकल्या बेड्या notorious robber in maharashtra karnataka and andhra pradesh handcuffed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14496867-689-14496867-1645110703987.jpg)
8 दरोडेखोर फरार-
आठ दरोडेखोरांचा तपास सुरू असून त्यामध्ये सुरेश धर्मा पवार,राजू रज्जूलाल पवार बापू शंकर काळे राजू पवारचा जावई सोहेम, विनोद बापू पवार,परसु काळे (सर्व रा, होटगी, ता दक्षिण सोलापूर),गिरमल उर्फ गिरमा अंबादास काळे(रा मैनदर्गी, अक्कलकोट, सोलापूर),गोविंद संजय काळे(रा हनमगाव, दक्षिण सोलापूर) हे आठ दरोडेखोर फरार आहेत. त्यांचा तपास सुरू आहे, लवकरच त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, एपीआय रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मणसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख आदींनी केली आहे.