महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Solapur Hospital IT raid सोलापुरातील छापेमारीबद्दल आयकर विभागाकडून अधिकृत माहिती नाही, डॉ. परळे यांचा खुलासा - D Parale explanation after IT raid Solapur

सोलापूर शहरात 25 ऑगस्ट रोजी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी Income Tax raid Solapur विविध ठिकाणी धाड टाकली होती. पण या कारवाईत एकूण जप्त मालमत्ता, जप्त संपत्ती, बँक अकाऊंट याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या दिली नाही no official information from income tax department after Solapur raid. कारवाई झालेले डॉ गुरुनाथ परळे यांसोबत संपर्क केला असता त्यांनी काही माहिती देत खुलासा केला आहे.

Solapur cardiologist Dr. Gurunath Parle
डॉ. गुरूनाथ परळे, हृदय रोग तज्ज्ञ, सोलापूर

By

Published : Aug 28, 2022, 4:53 PM IST

सोलापूरसोलापूर शहरात 25 ऑगस्ट रोजी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी Income Tax raid Solapur विविध ठिकाणी धाड टाकली होती. शहरातील डॉ गुरुनाथ परळे, डॉ अनुपम शहा, अश्विनी हॉस्पिटलचे संचालक बिपीन पटेल, अश्विनी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे व मेहुल कन्स्ट्रक्शनचे मेहुल पटेल, रघोजी किडनी हॉस्पिटलचे विजय रघोजी, पंढरपूर येथील साखर कारखानदार अभिजित पाटील यांच्या कार्यालयाची व रुग्णालयांची कसून तपासणी केली. तब्बल तीन दिवस ही कारवाई सुरू होती. IT raid on Dr. Gurunath Parale hospital Solapur तीन दिवसांनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी रविवारी आपली कारवाई संपविली. पण या कारवाईत एकूण जप्त मालमत्ता, जप्त संपत्ती, बँक अकाऊंट याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या दिली नाही no official information from income tax department after Solapur raid. कारवाई झालेले डॉ. गुरुनाथ परळे यांसोबत संपर्क केला असता त्यांनी काही माहिती देत खुलासा केला आहे. Dr Parale explanation after IT raid Solapur

सोलापूरचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. गुरूनाथ परळे त्यांच्या रुग्णालयावर टाकण्यात आलेल्या इन्कम टॅक्स धाडीविषयी माहिती देताना

तीन दिवसांपासून सुरू असलेली कारवाई संपलीगुरुवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी सोलापूर शहरात इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली होती.तब्बल तीन दिवस चाललेल्या या कारवाई नंतर शनिवारी रात्री इन्कम टॅक्स अधिकारी कारवाई संपवून परत गेले आहेत .पण सोलापूर येथे झालेल्या कारवाई नंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही.

डॉ. गुरुनाथ परळे यांचे रुग्णालय


कारवाईनंतर डॉ गुरुनाथ परळे यांनी केला खुलासाअश्विनी हॉस्पिटल मध्ये कॉर्डियोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ गुरुनाथ परळे यांच्या खासगी हॉस्पिटलची तीन दिवस तपासणी करण्यात आली. यावर डॉ परळे यांनी खुलासा करत सांगितले की, अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझी काय पोस्ट आहे. त्याठिकाणहुन मिळत असलेल्या मानधनाबाबत चौकशी करण्यात आली. माझे बँक खाते किंवा बँकेतील लॉकर सील झालेले नाही. काहीही आक्षेपार्ह माझ्या हॉस्पिटलमध्ये मिळाले नाही किंवा माझ्या बँक लॉकरमध्ये देखील काहीही मिळाले नसल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली.काही बाबतीत लेखी उत्तरे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी मागितली आहेत ते आम्ही देऊ, असे डॉ गुरुनाथ परळे यांनी सांगितले.

इन्कम टॅक्सच्या रडारवर अश्विनी सहकारी हॉस्पिटलकाँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या बिपीन पटेल व मेहुल कन्स्ट्रक्शनचे मेहुल पटेल यांची मात्र कसून कसून तपासणी करण्यात आली .सोलापूर शहरातील सात रस्ता येथे अश्विनी हॉस्पिटल व कुंभारी येथे असलेल्या अश्विनी मेडिकल कॉलेजशी संबंधित असलेल्या डॉ अनुपम शहा, डॉ. गुरुनाथ परळे यांची देखील तपासणी करण्यात आली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी अश्विनी हॉस्पिटल व त्या संबंधित असलेल्याची चौकशी केली व काही कागदपत्रे घेऊन पुण्याकडे रवाना झाले.

हेही वाचाUnnatural Sex With Dog विकृतीचा कळस, 65 वर्षीय वृद्धाचा कुत्रीसोबत अनैसर्गिक संभोग

ABOUT THE AUTHOR

...view details