महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात हवेतून चालणारी डबलडेकर एअरबस आणणार - नितीन गडकरी - LOKSABHA

हवेतून चालणारी डबलडेकर बस सोलापूरला आणून द्यायला तयार आहे. या बसमध्ये २६० लोक बसतील. यात महापालिकेला पैसै द्यायची गरज नाही. बीओटी तत्वावर आपण ही सेवा चालू करू, अशी घोषणा गडकरी यांनी केली आहे.

नितीन गडकरी

By

Published : Apr 16, 2019, 3:24 PM IST

सोलापूर- भाजप नेते नितीन गडकरी यांची सोलापूर येथे प्रचारसांगतेची सभा पार पडली. या सभेत नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना हवेतून चालणारी डबलडेकर एअरबसचे स्वप्न दाखवले आहे. देशात केलेल्या योजनांचा दावा करताना लवकरच सोलापुरात एअरबस आणू, अशी घोषणा केली आहे.

नितीन गडकरी यांचे भाषण


गडकरी भाषणात म्हणाले, मी भारत सरकारच्या योजनेतून हवेतून चालणाऱ्या डबलडेकर बसेस आणल्या आहेत. मी औरंगाबदला डीपीआर बनवण्याची ऑर्डर दिला आहे. वॅपकॉस आणि ऑस्ट्रेलियन कंपनी डॉफरमेयर सोबत आम्ही करार केला आहे. आणि आता हवेतून चालणारी डबलडेकर बस सोलापूरला आणून द्यायला तयार आहे. या बसमध्ये २६० लोक बसतील. यात महापालिकेला पैसै द्यायची गरज नाही. बीओटी तत्वावर आपण ही सेवा चालू करू.

गडकरी यांनी पार्क मैदानावर पार पडलेल्या सभेत सोलापूर मतदारसंघातून डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी निवडून येतील, असा दावाही केला. काँग्रेसच्या न्याय योजनेवर टीका करताना पूर्वजांपासून नातवापर्यंत 'गरिबी हटाव'चा नारा दिला जात आहे. जलसिंचन योजनांविषयी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details